लेखकाविषयी :
विष्णू मनोहर हे भारतातील ख्यातनाम शेफ आहेत. फ्यूजन डिशेससाठी ते विशेष लोकप्रिय आहे. त्यांचा खास महाराष्ट्रीयन तडका (फ्लेवर) जगभरातील खाद्यप्रेमींना खूप आवडतो.
फूड अँड हॉटेल उद्योगात करिअर म्हणून प्रगती करू इच्छिणाऱ्या तरुण इच्छुकांसाठी विष्णू मनोहर प्रेरणादायी आहेत. विष्णू मनोहर हे मनोहर ग्रुप्सचे एक्झिक्युटिव्ह शेफ आहेत. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद, ठाणे येथील व्यावसायिक केटरिंग सेवेबरोबर इंदूर आणि अमेरिकेतही त्यांचा बोलबाला आहे.
कुकरी शोचे परीक्षक म्हणून विष्णू मनोहर प्रेक्षकांना भरभरून आनंद देत आहेत. रेडिओ मिर्ची वरील 'सीधे तवा से' आणि विश्वभारतीवरील 'चुल्हा चौका' सारखे कार्यक्रम आयोजित करण्याचा विशेषाधिकार त्यांना मिळाला आहे . बेसिक इंडियन ग्रेव्ही या विषयावर अमीन सायानी यांच्या आवाजात अलीकडेच लाँच झालेल्या त्यांच्या सीडी आणि व्हिडिओ कॅसेट्सना भारत आणि यूएईमध्ये भरपूर प्रतिसाद मिळत आहे. जगभरातील भारतीय खाद्यप्रेमींसाठी त्यांनी उत्कृष्ट पाककृती आणि कुकिंग कौशल्य प्रदर्शित करणारी एक वेबसाइट सुरू केली आहे. पाककृतींच्या जगातले तब्बल २४ विक्रम विष्णू मनोहर यांच्या नावावर नोंदवले गेले आहेत. त्यांच्या कल्पक प्रयोगशीलतेला अनुभवाची जोड मिळाल्याने त्यांची पुस्तके, कुकरी शोज, किंवा यू ट्यूब चॅनल, सर्वत्र ते लोकप्रिय आहेत.
Vishnu Manohar is a renowned chef in India. He is especially popular for his fusion dishes. His unique Maharashtrian touch (flavor) is loved by food enthusiasts around the world.
Vishnu Manohar is an inspiration for young aspirants who wish to build a career in the food and hotel industry. He serves as the Executive Chef of the Manohar Group. Along with professional catering services in Pune, Nagpur, Aurangabad, and Thane, he has also gained recognition in Indore and the United States.
As a judge on cookery shows, Vishnu Manohar entertains audiences immensely. He has had the privilege of hosting programs such as “Seedhe Tawa Se” on Radio Mirchi and “Chulha Chauka” on Vishvabharati.
His recently launched CDs and video cassettes on the topic of Basic Indian Gravy, narrated in the voice of Amin Sayani, have received a great response in India and the UAE.
He has also launched a website showcasing excellent recipes and cooking skills for Indian food lovers worldwide.
An impressive 24 records in the culinary world have been registered in Vishnu Manohar’s name. With his creative experimentation combined with vast experience, his books, cookery shows, and YouTube channel are all widely popular.