Skip to product information
Sarvansathi Bhujal Shastra
Your cart is empty

Have an account? Log in to check out faster.

खरेदी सुरु ठेवा

Sarvansathi Bhujal Shastra

Author(s):  Dr Shrikant Daji Limaye

नवीन धरणे बांधायला चांगल्या जागा नाहीत, जुनी धरणे गाळाने भरून जात आहेत, कालव्यांच्या पाण्याचे नीट व्यवस्थापन न झाल्यामुळे नदी-नाल्यांकाठच्या सुपीक जमिनी खारपड होत आहेत व धरणे बांधताना जे जे फायदे मिळणे अपेक्षित होते त्यापेक्षा पुष्कळच कमी फायदे प्रत्यक्षात पदरात पडत आहेत, असे चित्र भारतासह अनेक विकसनशील राष्ट्रांत दिसत आहे. म्हणजे ज्या नदी-नाल्यांचे पाणी धरणे बांधून सरकारतर्फे योजना करून पुरवले जाते, त्यांचे व्यवस्थापन सरकारतर्फे नीट होत नाही; आणि भूजलसंपत्ती ही पारंपरिक पध्दतीने जमिनीच्या मालकांची म्हणजे शेतकऱ्यांची असल्याने तिचे व्यवस्थापन सरकारला करता येणे अवघड आहे, असा हा गुंता बनला आहे.

भूजल व्यवस्थापनामध्ये भूजलाचा साठा वाढवणे हा एक भाग, तर भूजलाच्या उपशावर नियंत्रण ठेवणे, उपसलेल्या पाण्याचा काटकसरीने उपयोग करणे, कमी पाण्यावर येणारी पिके घेणे, कारखान्यात वापरलेल्या पाण्याचे शुद्धीकरण करून पुनर्वापर करणे हा दुसरा पूरक असा भाग आहे. पावसाळ्यात नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन्ही पद्धर्तीनी भूजलाच पुनर्भरण करणे हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र पावसाचे पाणी अडवून व जिरवून भूजलाचा साठा समृद्ध केल्याने जर नदी-नाल्यांतून वाहणारे पाणी कमी झाले तर मोठ्या धरण योजनांच्या जलाशयांमध्ये पाणी कमी येऊन वादाला तोंड फुटू शकते. कारण धरणाच्या जलाशयातील पाणी सरकारी मालकीचे म्हणजे सार्वजनिक मालकीचे तर भूजल बहुतांशी खाजगी मालकीचे असते. त्यामुळे पाण्याच्या मालकीच्या हक्काचे हस्तांतर होते.

भविष्य काळात हवामान व मॉन्सूनचा पाऊस या दोन्ही गोष्टी आणखी लहरी व अनिश्चित होण्याची शक्यता जागतिक स्तरावर वर्तवली गेली आहे. म्हणजे पावसाळ्यात एकूण पाऊस जरी तेवढाच पडला तरी त्याच्या पडण्याची पद्धत बदलेल, कधी प्रचंड जोराचा पाऊस पडून महापूर येईल तर नंतर बऱ्याच दिवसांचा खंड पडेल. अशा धक्क्यांमुळे भूजलाचे पुनर्भरण कमी प्रमाणात होईल. पाऊस आणि त्यांतून निर्माण होणारे भूजल व नदी-नाल्यांचे पाणी यांच्यामधील दुवा किंवा सांधा म्हणजे पाणलोट क्षेत्र। असे हे पाणलोट क्षेत्र उजाड होऊ न देता, बांध-बंदिस्ती, वनीकरण, नालाबंधारे अशा मृदू-जलसंधारण योजनांनी समृद्ध व सुरक्षित ठेवले गेले तर पावसाचे धक्के व लहरीपणा सहन करण्याची ताकद पाणलोट क्षेत्रात व पर्यायाने जलसंपत्तीमध्ये येईल. (प्रकाण १० मधील काही भाग)

In many developing countries, including India, a concerning picture is emerging: there are no suitable locations to build new dams, old dams are getting silted up, and due to poor management of canal water, fertile lands along rivers and streams are becoming saline. As a result, the benefits expected from dam construction are falling far short of what was anticipated. This reflects a broader problem: the water from rivers and streams that is supplied through government-planned dam projects is not managed properly by the authorities, and groundwater—traditionally considered the property of landowners, mainly farmers—is difficult for the government to manage. This has created a complex challenge.

Groundwater management involves multiple aspects. One part is increasing groundwater reserves, while the complementary part includes controlling over-extraction, using withdrawn water judiciously, cultivating crops that require less water, and treating and reusing industrial water. Additionally, replenishing groundwater naturally or artificially during the rainy season is also crucial. However, if efforts to conserve and recharge groundwater reduce the flow of water in rivers and streams, the reservoirs of large dam projects may receive less water, leading to potential conflicts. This is because reservoir water belongs to the government, i.e., the public, while most groundwater is privately owned. Consequently, disputes arise over the transfer of water ownership rights.

Looking ahead, climate change and monsoon rainfall are expected to become more erratic and extreme globally. Even if the total rainfall remains the same, its pattern may change—there could be intense rainfall causing floods followed by prolonged dry spells. Such shocks will reduce the natural recharge of groundwater. The connection between rainfall, groundwater formation, and river/stream flow is defined by a watershed. If watersheds are not left degraded but are instead strengthened and secured through structures like embankments, afforestation, and small-scale water conservation measures, the watershed—and thereby water resources—will be better equipped to withstand erratic rainfall and extreme events.

Book Format

Paperback
In Stock
₹240.00
Published on 2012 | 156 Pages
Available on other Platform as well
AMAZON

Dr Shrikant Daji Limaye

माझे वडील श्री. दाजी गणेश लिमये यांनी B.Ag. (बॅचलर ऑफ अग्रिकल्चर) ही पदवी घेतल्यानंतर दोन वर्षे  बडोद्याला श्रीमंत सयाजीराव महाराज यांचकडील शेतीवर अनुभव घेऊन १९३३ साली पुण्यांत 'भूजल  सल्लागार' म्हणून काम सुरू केले.

योगायोगाने पहिली चार कामे पौड, पियाळी (कोकणात राजापुराजवळ) पनवेल व पाकणी (सोलापूर जवळ)  अशी 'प'च्या बाराखडीतील गावांची मिळाली, त्याकाळी शास्त्रीय पद्धतीने भूजल संशोधन करण्याची कल्पना  नवीन होती. भारतांतील ब्रिटीश सरकार सुद्धा परदेशांतून पानाडे बोलावून त्यांच्या दैवी शक्तीच्या आधारावर  खेळ्यांमधून पिण्याच्या पाण्याच्या विहिरी बंधित असे. नंतर 'मैन्सफील्ड' व 'श्मिड' या दोन ब्रिटिश कंपन्यांनी  बनवलेली जलशोधक यंत्र ('वॉटर फाइंडर' मशीन्स) शेतकी खाते व डिस्ट्रिक्ट लोकल बोडांत (जुन्या काळांतील जिल्हा परिषद) आणली गेली. वडिलांनीही एक 'मंन्सफिल्ड' यंत्र आणले. यामध्ये लोहचुंबकाची एक लांब व पातळ सुई (दक्षिणोत्तर राहाणारी) व तिच्या खाली पूर्व पश्चिम दिशेत तांब्याची वेटोळी असणारी नळी असे. परंतु स्थानिक खडकांचा व जलधारक प्रस्तरांचा अभ्यास केला तरच या यंत्राचा उपयोग होई.

१९४० च्या आसपास सोलापूर जिल्ह्यांतील वाशी व करमाळा तालुक्यांतील भूजलाच्या स्थितीवर वडिलांनी पहिला शास्त्रीय निबंध लिहिला. त्यानंतर त्यांचे बरेच निबंध 'इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स' व 'जिऑलॉजिकल,  माइनिंग अण्ड मेटॅलर्जिकल सोसायटी' यांचे मासिकांतून प्रसिद्ध झाले. त्यापैकी काहींना बक्षिसेही मिळाली.  मराठी भाषेत त्यांनी भूजलविषयक लिहिलेले लेख, किलॉस्कर, शेतकी आणि शेतकरी व केसरी मधूनही प्रसिद्ध होत असत.

My father, Shri Daji Ganesh Limaye, after earning a B.Ag. (Bachelor of Agriculture)  degree, spent two years gaining practical experience on the farm of the wealthy  Sayajirao Maharaj in Baroda. In 1933, he began working in Pune as a “Groundwater  Consultant.” By coincidence, his first four assignments happened to be in the village of Paud, Piyali (near Rajapur in Konkan), Panvel, and Pakni (near Solapur) — all villages starting with the letter “P.” At that time, the concept of conducting  scientific groundwater research was still new.

Even the British government in India had previously relied on foreigners called  Panade, who claimed to locate drinking water in wells using so-called divine powers. Later, two British companies, Mansfield and Schmidt,  introduced water-finding machines (“Water Finder” machines) to the Agriculture Department and District Local Boards (the old district councils). My father also acquired a Mansfield  machine, which included a long, thin iron- cobalt needle (pointing northwest) and a copper coil below it aligned  east-west. However, the machine could only be used effectively after studying the local  rocks and aquifer-bearing strata.

Around 1940, my father wrote his first scientific paper on the groundwater conditions of the Washi and Karmala talukas in Solapur district. After that, many of his papers  were published in the monthly journals of the Institution of Engineers and the  Geological, Mining, and Metallurgical Society, some of which won awards. In addition, his articles on groundwater in Marathi were published in Lekhar, Kiloskar, Shetki  Ani Shetkari, and Kesari, gaining recognition among readers.

Publisher

Sakal Prakashan

Author

Dr Shrikant Daji Limaye

Language

Marathi

ISBN

9789380571423

Binding
  • Paperback
Pages

156

Publication Year

2012

Dimensions
6.7 x 9.5

You may also like

ए ते झेड दुग्धव्यवसाय
ए ते झेड दुग्धव्यवसाय

ए ते झेड दुग्धव्यवसाय

Rs. 450.00
Rs. 450.00

ए ते झेड दुग्धव्यवसाय

by Dr. Parag Ghogale, Prashant Kulkarni

1500+ People Purchased last month

Rs. 450.00 (Tax Included)
शाश्वत नैसर्गिक शेती
शाश्वत नैसर्गिक शेती

शाश्वत नैसर्गिक शेती

Rs. 240.00
Rs. 240.00

शाश्वत नैसर्गिक शेती

by राजेंद्र भाट

1500+ People Purchased last month

Rs. 240.00 (Tax Included)
Future of Food
Future of Food

Future of Food

Rs. 499.00
Rs. 499.00

Future of Food

by Dr Gopal Lal, Arun Tiwari

1500+ People Purchased last month

Rs. 499.00 (Tax Included)
Healthy Raan bhajya
Healthy Raan bhajya

Healthy Raan bhajya

Rs. 299.00
Rs. 299.00

Healthy Raan bhajya

by Ashwini Chothe

1500+ People Purchased last month

Rs. 299.00 (Tax Included)
Jaiveek Khate aani Aushadhe
Jaiveek Khate aani Aushadhe

Jaiveek Khate aani Aushadhe

Rs. 140.00
Rs. 140.00

Jaiveek Khate aani Aushadhe

by Diliprao Deshmukh Baradkar

1500+ People Purchased last month

Rs. 140.00 (Tax Included)
Bhumi Ki Urvarakta
Bhumi Ki Urvarakta

Bhumi Ki Urvarakta

Rs. 200.00
Rs. 200.00

Bhumi Ki Urvarakta

by Pratap Chiplunkar

1500+ People Purchased last month

Rs. 200.00 (Tax Included)

Frequently asked questions

How can I place an order for a book?

You can buy books directly from sakalpublications.com, Amazon.in, or sakalpublications.com. You may also contact our customer care for personalized assistance.

How long does it take for my order to arrive?

Orders are usually delivered within 5–7 working days across India. Delivery time may vary depending on your location and courier service.

Can I modify or cancel my order?

If your order has not been dispatched, you may contact us immediately at sakalprakashan@esakal.com or on WhatsApp 88888 49050 for cancellation or address changes.

How can I track my order?

You can track your order through the tracking link shared by the courier or your Amazon/sakalpublications.com account. For website orders, please contact us for updates.